हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ६६ व्या दिवशी, कपाळावर काळे तिलक लाऊन आंदोलन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्याकरीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात होण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीला कृती समितीचा संघर्ष भर पावसाळ्यात उन्ह पाऊस वारा झेलत सुरू आहे. स्थानीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलनाचा काल ६२ वा दिवस होता. मेडिकल कॉलेज करीता महिलांच्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे दर रविवारी काही वेगळे आंदोलन करण्यात येते. ह्या रविवारी महिलांनी कपाळावर काळे तीलक लाऊन सरकार आणि स्थानिक प्रतिनिधी ह्यांचा निषेध केला.

हिंगणघाट येथे सुरू असलेल्या या आंदोलनात वेगवेगळे वळण, टप्पे आणि यशही या आंदोलनाला मिळाले आहे, त्यामध्ये वर्धा आणि अमरावती चे ठिकाणाला तात्पुरती स्थगिती हे प्रमुख उपलब्धि आहे. तसेच विरोधी पक्ष नेते श्री जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावर ह्यांनी या प्रश्न विधानसभेत उपस्थित करून हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे. त्यावर प्रतिउत्तर म्हणून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करूंन कॉलेजचे ठिकाण निश्चित करण्यात येण्याचे संगितले अशा रीतीने आशावाद निर्माण होताना दिसत आहे;

यावेळी महिला कृती समितीच्या सीमा मेश्राम ह्यांनी आंदोलन तसेच पुढे रेटायचे ठरवले. त्यानुसार ६२ व्यां दिवशी महिलांनी स्वतःचे कपाळावर काळे तिलक लाऊन प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधींना आपला रोष दाखवला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास फक्त सदनात प्रश्न मांडून नाही तर सुयोजित कृती कराव्यात अन्यथा आंदोलन पुढे ढकलण्याचा इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीला कृती समितीनी दिला. काळा तिलक हा विनाशक चिन्ह असूनही महिलांनी ते कपाळावर लावले हे प्रामुख्याने नोंद घेण्यासारखे आहे.

यामध्ये प्रामुख्याने सावित्रीच्या लेकी सामाजिक संस्थाच्या सीमा मेश्राम, निर्मला भोंगाडे, सुषमा पाटील, राजश्री बांबोळे, मोना फुलझेले, प्रमोदिनी नगराळे, योजना वासेकर, लता साखरकर, संध्या जगताप, लीना नगराळे, तेजस्विनी पाटील, भारती वैद्य, भाग्यश्री नगराळे, सुरेख मेश्राम, शारदा जामुनकर, वंदना भगत, प्रेरणा भगत, प्रीती चव्हाण उपस्थित होत्या तर पुरुषांपैकी श्याम इडपवर, हर्षल गुण्डे, सुरेंद्र टेंभुरणे, प्रफुल मेश्राम, संदेश मून इत्यादी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

19 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

20 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

20 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

21 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

21 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago