वर्धा: तहसिल परिसरात वृक्षरोपण करुन महसूल सप्ताहाचा शुभारंभ, यावेळी करण्यात आले विविध दाखल्याचे वितरण.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.2:- महसूल प्रशासनाच्यावतीने दि.1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्याता आले आहे. या निमित्ताने महसूल दिनाचे औचित्य साधून तहसिल कार्यालय परिसरात उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांच्याहस्ते वृक्षरोपण करुन व विविध दाखल्याचे वाटप करुन महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार अजय धर्माधिकारी, बाळुताई भागवत, हेमा जाधवर, भगवान वनकर, मंडळक्षअधिकारी, तलाठी तसेच कार्यालयातील कर्मचा-यांनी सुध्दा या वृक्षरोपण कार्यक्रमास सहभाग नोंदवून वृक्षलागवड केली.

यावेळी तहसिल कार्यालय परिसरात विविध जातीची 383 वृक्षाचे वृक्षरोपण करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना सातबारा व 321 लाभार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. महसूल सप्ताहा दरम्यान युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सत्कार व संवाद असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तहसिल कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago