मोहपा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घाणीचे साम्राज्य नगरपालिका प्रशासन झोपेत.

युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर:- जिल्हातील मोहपा नगर परिषद मध्ये गेल्या दोन वर्षापासून अनेक विकासकामे सुरु आहे. पण दोन वर्ष लोटूनही गावाच्या मध्यभागी मधुगंगा नदीवर असलेल्या मुख्य पुलाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. याशिवाय अनेक कामे कासवगतीने सुरू आहे. संपूर्ण गाव हे समस्याचे माहेरघर झालेले आहे.

मोहपा शहरातील मुख्य चौकात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतण्यासमोर कचऱ्याचा ढीग मातीचा ढीग त्याचप्रमाणे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्यात थोर पुरुषांच्या समोर अशी घाण असल्यामुळे राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन यावर्षी मोठ्या थाटाने त्या आंबेडकर पुतळ्या जवळ साजरा करू शकले नाहीत. नगरपालिका आहे की, समस्या पालिका असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

मोहपा येथे अंदाजे दोन वर्षापासून मधुगंगा नदीवर असलेल्या मोठ्या पुलाचे काम सुरु झाले. पण आता जवळपास दोन वर्ष लोटूनही पुलाचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पूल अर्धवट असूनही, हा पूल रहादारीसाठी खुला केलेला आहे. पुलाच्या एका बाजूला मोठा खचका आहे तर दुसऱ्या बाजूला मोठा खड्डा. या खड्ड्यात अनेकदा चारचाकी गाड्या फसतातही व उलटतात सुद्धा. त्यामुळे अनेकजण थोडक्यात बचावले. एखाद्याची प्राणहरी झाली म्हणजे ह्या समस्या नगरपरिषद सोडवणार का असा प्रश्न गावकरी करीत आहे .आतापर्यन्त पुलाचे काम कां रखडले आहे हे कुणालाही ठाऊक नाही. पालिका अधिकारी, कर्मचारी सुस्त असल्यामुळे दोन वर्षाचा कालावधी लोटूनही पुलाचे काम अर्धवटच आहे. या बाबीकडे नगरपरिषद लक्ष देणार का? त्याचप्रमाणे एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास योजना अंतर्गत 2008 मध्ये स्व. किसन फागुजी बनसोड समाजभवनाचे काम सुरु झाले. या समाजभवनाचे काम पूर्ण करण्याकरिता 9 महिन्याचा कालावधी ठरलेला होता. परंतु हे बांधकाम पूर्ण करण्याकरिता एकूण 9 वर्षाचा कालावधी लागला. परंतु आजपवातो या समाजभवनाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यापासून जनता मात्र उपेक्षित आहे. समजभवनाभोवती कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असून शासनाच्या व जनतेच्या पैश्याचा अपव्यय झालेला आहे.

तरी लवकरात लवकर पुलाचे काम व समाजभवनाची स्वच्छता करून लोकांना त्यांच्या सुविधेकारिता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मोहपा नगरिचे माझी नगर सेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रशीद शेख भिमराव डोंगरे आरपीआय उपाध्यक्ष मुकेश बोरकर व्यापारी आघाडी अध्यक्ष प्रमोद रेवतकर राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष वसंता कावडकर मनोज कावडकर सुशांत बागडे शंकर लोखंडे व इतर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होतेअन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा गावातील नागरिकांनी दिलेला आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

6 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

18 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

18 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

18 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

18 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

18 hours ago