नागपूर: परिवाराच्या विरोधात जाऊन केला प्रेमविवाह मग अस काय झालं की नर्सने केली आत्महत्या.

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयात परीचारिका म्हणून काम करणाऱ्या एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे.

आपल्या परिवाराच्या विरोधात जाऊन तिने प्रेमविवाह केला. हा प्रेमविवाह अयशस्वी झाल्याने तिने खळबळजनक पाऊल उचलले मग या नव विवाहितेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमरन लक्ष्मण महाकाळे वय 22 वर्ष रा. रामटेकेनगर असे आत्महत्या केलेला महिलाच नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सीमरन महाकाळे वय 22 वर्ष विवाहित महिला बेसा येथील एका पॅथॉलॉजीमध्ये परीचारिका म्हणून नोकरीवर होती. दरम्यान तिची अक्षय नकोसे या तरुणाशी ओळख झाली. आणि दोघांचे प्रेमसंबंध फुलले. त्यात परिवाराचा विरोध झुगारून दोघांनी प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सीमरनने नर्सिग कोर्सला प्रवेश घेतला. दरम्यान तिचे आणि पतीचे पटत नव्हते. चारित्र्याच्या संशयावरून पती मारहाण करीत असल्याची तक्रार ती आईकडे करीत होती. त्यामुळे ती माहेरी परत आली. ती प्रेमविवाह टिकू न शकल्याने नैराश्यात गेली.

ती एकाकी राहायला लागली. त्यानंतर तिची एका तरुणा बरोबर ओळख झाली. त्या युवकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवर वाद झाला. त्यामुळे ती निराश होती. सिमरनने शुक्रवारी सायंकाळी घरात ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करत आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

9 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

9 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

10 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

10 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

10 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

11 hours ago