कळमेश्वर मातंग समाज आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- तालुका मातंग समाज आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे प्रबोधन मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती समारोह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कळमेश्वरचे पोलिस निरीक्षक सोळसे यांनी केले तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवजी जाधव होते. कार्यक्रमाचे मुख्यवक्ता प्रदीप बोरकर, विक्रीकर उपायुक्त वर्धा यांनी अण्णा भाऊंच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

यावेळी सोळसे यांनी आपल्या उद्घाटनीय अभिभाषणातून महापुरुषांच्या विचारांप्रती एकनिष्ठ राहण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक विभागीय उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत यथोचित मार्गदर्शन केले. रविंद्रजी नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना काळाभिमुख शिक्षण घ्या असा संदेश दिला. एकजुटीचा संदेश पद्माकर बावणे यांनी दिला तर व्यावसायिक शिक्षणाचे महत्व क्रांतीचंद्र भावे यांनी सांगितले. नितीन तायवाडे यांनी युवाशक्तीचे महत्व स्पष्ट केले. भारत डोंगरे यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सर्वश्री सुनिल तायवाडे, बुधाजी सुरकार, गुरुदास बावणे, कावळे गुरुजी, काॅ. दिलीप तायडे, शिल्पाताई वानखेडे, गुलाब गायकवाड, बबनजी जगधने व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अशोक भावे यांचा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंतांचा सत्कार शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा.राहुल हिवराळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वैशाली खडसे यांनी केले आणि आभार प्रदर्शन किरण वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायणजी प्रधान, वासुदेवजी भावे, दिलीप खडसे, नरेश आंबुलकर, बल्लु खडसे, सुरज बावणे, रामा तायवाडे, सारीका खोडके, सागर खडसे, रवी लोखंडे इत्यादींनी परिश्रम केले.सामुहीक भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

2 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

5 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago