नागपूर येथील राजीव नगर हादरले, दोघांवर धारधार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू, दुसरा देत आहे मृत्यूशी झुंज.

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागपुर शहर पोलीस अंतर्गत येत असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील राजीव नगर येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन मित्रांवर सात ते आठ जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. मात्र या हल्ला कोणत्या कारणाने करण्यात आला याचे कारण कळू शकले नाही.

राजीवनगर बस स्टॉप जवळ असलेल्या एका पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सात ते आठ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी ता. 16 रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमीरित्या झाला असून त्याचावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

या हल्ल्यात राकेश मिश्रा वय 27 वर्ष याचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रवी जयस्वाल वय 28 वर्ष दोघेही रा. राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते.

राकेश आणि रवी हे दोघे मित्र दररोज सायंकाळी बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. बुधवारी रात्री पण तिथे बसले होते. काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी अचानक धारदार हत्याराने सपासप वार सुरु केले. राकेश हा जखमी होऊन जागीच निपचित पडला. तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला आणि काचेचे केबिन आतून बंद करुन घेतले. आरोपी त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि कारमध्ये बसून फरार झाले.


या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ताप्यासह पोलीस निरीक्षक भीमा नरके घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळू शकलेले नाही. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

3 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

3 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

3 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

3 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

3 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

3 hours ago