आकाश पांचाळ – पुणे जिल्हा प्रतनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील जुन्नर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील आळे गावात एका चार वर्षीय चिमुकल्यावर दबा धरून असलेल्या बिबटयाने हल्ला केला या हल्लात हा बालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील आळे गावातील तितर मळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश हा चार वर्षीय मुलगा अंगणात आजोबा निवृत्ती भुजबळ यांच्या बरोबर खेळत असताना, अचानक घरासमोरील ऊसाच्या शेतातुन आलेल्या बिबट्याने या बालकावर हल्ला करत त्याच्या मानेला पकडुन नेत असताना, या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातुन सोडवले.
परंतु या हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाला असुन, त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. एम. काकडे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…