अहेरी तालुक्यात दोन्ही ग्राम पंचायत मध्ये आविसची सरशी, भाजपाला एकपण जागा नाही.

राष्ट्रवादी व अविसला प्रत्येकी एक एक सरपंच.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यात राजाराम व आवलमरी ग्रामपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 18 जागां पैकी 11 जागांवर अजय भाऊ कंकडालवार समर्थित अविसने बाजी मारून सदस्य निवडून आणले तर राष्ट्रवादीला सहा आणि भाजपला मात्र एकही जागा मिळू शकली नाही.

राजाराम ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून आत्राम मंगला खुशालराव ह्या राष्ट्रवादीच्या तर बहुमत अविस कडे आले आहे. सहा सदस्य आविसचे, दोन सदस्य राष्ट्रवादी तर माजी उपसरपंच अपक्ष म्हणून सदस्य निवडून आले आहेत.

विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून आलाम विनायक सुरेश, सोयाम सुशीला रोहिदास, कंबगोणीवार रोशन बाबुराव तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये रमेश पोरतेट, यशोदा दिवाकर आत्राम, पूजा बाबुराव सोयाम आणि प्रभाग क्रमांक तीन मधून सुरक्षा आकदर सुखदेव आलाम व संजावली अर्गेला विजयी झाल्या आहेत.

आवलमारी ग्रामपंचायत मध्ये आविसच्या पोरतेट अक्षय मधुकर यांनी सरपंचाकरिता बाजी मारली. सदस्यांमध्ये येथेही अवीसने पाच सदस्य निवडून बहुमताकडे वाटचाल केली. येथे चार सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत.

प्रभाग क्रमांक एक मध्ये नागेश कुमराम, सह्याद्री आत्राम, अमिता कोरेत तर प्रभाग क्रमांक दोन मधील विजयी उमेदवारात लक्ष्मी झाडे, देवाजी आत्राम, रंजना आलम सोबतच प्रभाग क्रमांक तीन मध्ये सविता मडावी, दिपाली आत्राम, चिरंजीव चिलवेरवार यांनी बाजी मारली.

भाजपने आवलमरीत उमेदवाराच उभे केले नसल्याचे कळते तर राजाराम मध्ये अटीतटीच्या लढतीत मात्र सरपंच सहित एकही उमेदवार निवडून आले नाहीत. हा अंतर्गत कलहाचा परिणाम असल्याचे बोलले जाते.

कोण्जेड ग्रामपंचायत मधील एकमेव उमेदवार सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत जोगा कुडमेथे निवडून आले तर रेगुलवाहीत अविरोध म्हणून नीलिमा नेताम यांना घोषित करण्यात आले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारत विद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय गणित दिनी गणितज्ज्ञ रामानुजन यांना वाहण्यात आली श्रध्दांजली.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी…

12 hours ago

ग्राहक रक्षक समितीचा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा 2024 नाशिक येथे उत्साहात संपन्न.

उषाताई कांबळे,सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक…

12 hours ago

वर्धा: नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहिम, उपक्रमाचे शिबिरे आयोजित करुन सुशासन सप्ताह साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…

12 hours ago

सोनू करोसिया यांची अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत वर्धा जिल्हा महासचिव पदी नियुक्ती.

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…

12 hours ago

पुण्याचे भाजप आमदाराच्या मामाची 72 वेळा वार करुन हत्या, हत्येची सुपारी पत्नीनेच दिल्याने खळबळ.

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…

13 hours ago

चंद्रपूर: काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा: गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत निषेध.

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…

13 hours ago