राष्ट्रवादी व अविसला प्रत्येकी एक एक सरपंच.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यात राजाराम व आवलमरी ग्रामपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 18 जागां पैकी 11 जागांवर अजय भाऊ कंकडालवार समर्थित अविसने बाजी मारून सदस्य निवडून आणले तर राष्ट्रवादीला सहा आणि भाजपला मात्र एकही जागा मिळू शकली नाही.
राजाराम ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून आत्राम मंगला खुशालराव ह्या राष्ट्रवादीच्या तर बहुमत अविस कडे आले आहे. सहा सदस्य आविसचे, दोन सदस्य राष्ट्रवादी तर माजी उपसरपंच अपक्ष म्हणून सदस्य निवडून आले आहेत.
विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून आलाम विनायक सुरेश, सोयाम सुशीला रोहिदास, कंबगोणीवार रोशन बाबुराव तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये रमेश पोरतेट, यशोदा दिवाकर आत्राम, पूजा बाबुराव सोयाम आणि प्रभाग क्रमांक तीन मधून सुरक्षा आकदर सुखदेव आलाम व संजावली अर्गेला विजयी झाल्या आहेत.
आवलमारी ग्रामपंचायत मध्ये आविसच्या पोरतेट अक्षय मधुकर यांनी सरपंचाकरिता बाजी मारली. सदस्यांमध्ये येथेही अवीसने पाच सदस्य निवडून बहुमताकडे वाटचाल केली. येथे चार सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत.
प्रभाग क्रमांक एक मध्ये नागेश कुमराम, सह्याद्री आत्राम, अमिता कोरेत तर प्रभाग क्रमांक दोन मधील विजयी उमेदवारात लक्ष्मी झाडे, देवाजी आत्राम, रंजना आलम सोबतच प्रभाग क्रमांक तीन मध्ये सविता मडावी, दिपाली आत्राम, चिरंजीव चिलवेरवार यांनी बाजी मारली.
भाजपने आवलमरीत उमेदवाराच उभे केले नसल्याचे कळते तर राजाराम मध्ये अटीतटीच्या लढतीत मात्र सरपंच सहित एकही उमेदवार निवडून आले नाहीत. हा अंतर्गत कलहाचा परिणाम असल्याचे बोलले जाते.
कोण्जेड ग्रामपंचायत मधील एकमेव उमेदवार सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत जोगा कुडमेथे निवडून आले तर रेगुलवाहीत अविरोध म्हणून नीलिमा नेताम यांना घोषित करण्यात आले.

