अक्षय जाधव पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- सध्या राज्यात मराठा आरक्षण संघर्ष पेटला आहे. त्यात पुणे येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मूळचा अकोला येथील एका 19 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी पुण्यात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अभय गजानन कोल्हे, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
आत्महत्या केलेल्या अभय कोल्हे हा मूळ अकोला शहरातील डाबकी रोड भागातील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे करोना काळात निधन झाले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याला आई व बहिणीची चिंता होती. त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो विवंचनेत होता, असे सांगण्यात येत आहे.
अभयने पुणे येथील चाकण भागात २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करून तरुणाच्या बहिणीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…