राजुरा येथील सोमेश्वर महादेव मंदिराच्या आवारात भाजप कडून दिवाळी फराळाचे वाटप.

गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमच्यासाठी दिवाळी भेट:- देवराव भोंगळे

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधि
मो. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- येथील सोमेश्वर महादेव मंदिराच्या आवारात आज सकाळी भारतीय जनता पार्टी राजुरा च्या वतीने विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परीसरातील गोरगरिब नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले की, आपल्या घरी गोडधोड व्हावे, नातेवाईकांना फराळ द्यावा असे प्रत्येक कुटुंबाला वाटते परंतु, प्रत्येकाला हे शक्‍य होत नाही. आर्थिक विवंचनेने दिवाळीही साजरी करू न शकणारे अनेक कुटुंबे असतात. या कुटुंबांना मदत करण्यासाठी आम्ही काही भव्यदिव्य करीत नाही. एक दिवाळी फराळ देत आहोत; खरंतर यातूनचं आम्हाला समाधान मिळते, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमची दिवाळी भेट आहे. आमची दिवाळी अशीच गोरगरिब बांधवांसोबत साजरी होते. गरिबांच्या घरातही दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवा जळावा, अशी प्रार्थना भगवान सोमेश्वर महादेवाच्याचरणी मी यानिमित्तानं करतो. असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, माजी नगरसेवक राजु डोहे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, सुरेश रागीट, सचिन बैस, विनोद नरेन्दुलवार, भाऊराव खाडे, प्रदीप मोरे, महेश रेगुंडवार, मोहन कलेगुरवार, छबिलाल नाईक, योगेश येरणे, विष्णू नेवळकर, पंढरी लोहे आदींसह मोठ्या संख्येने स्थानिकांची उपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

1 day ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago