गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमच्यासाठी दिवाळी भेट:- देवराव भोंगळे
तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधि
मो. 98224 77446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- येथील सोमेश्वर महादेव मंदिराच्या आवारात आज सकाळी भारतीय जनता पार्टी राजुरा च्या वतीने विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परीसरातील गोरगरिब नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले की, आपल्या घरी गोडधोड व्हावे, नातेवाईकांना फराळ द्यावा असे प्रत्येक कुटुंबाला वाटते परंतु, प्रत्येकाला हे शक्य होत नाही. आर्थिक विवंचनेने दिवाळीही साजरी करू न शकणारे अनेक कुटुंबे असतात. या कुटुंबांना मदत करण्यासाठी आम्ही काही भव्यदिव्य करीत नाही. एक दिवाळी फराळ देत आहोत; खरंतर यातूनचं आम्हाला समाधान मिळते, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमची दिवाळी भेट आहे. आमची दिवाळी अशीच गोरगरिब बांधवांसोबत साजरी होते. गरिबांच्या घरातही दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवा जळावा, अशी प्रार्थना भगवान सोमेश्वर महादेवाच्याचरणी मी यानिमित्तानं करतो. असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, माजी नगरसेवक राजु डोहे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, सुरेश रागीट, सचिन बैस, विनोद नरेन्दुलवार, भाऊराव खाडे, प्रदीप मोरे, महेश रेगुंडवार, मोहन कलेगुरवार, छबिलाल नाईक, योगेश येरणे, विष्णू नेवळकर, पंढरी लोहे आदींसह मोठ्या संख्येने स्थानिकांची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348