उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा दि.16:- मोहन डांगे (रेल्वे पोलीस) यांच्या संकल्पनेतून निस्वार्थ रुग्णसेवा परिवार व साई जीवन रक्तपेढी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शिवचरण मानेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ पहुरपूर्णा ता.शेगांव जि.बुलढाणा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले व पहुरपूर्णा गावकरी मंडळीने एक आगळावेगळा संदेश दिला.
खेड्या गावामध्ये रक्तदानाबद्दल चळवळ मोहन दादा यांनी उभी केली आणि खूप मोठा प्रतिसाद त्यात चळवळीला मिळाला. या कार्यक्रमाची प्रास्ताविक आकाश सुलताने यांनी केल व रक्तदान शिबिराची सुरुवात गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. सरपंच अनंता बर्डे, दिलीप डांगे, अरुण मानेकर तसेच डॉ. दिनेश हिवराळे व अतुल भांगे, पंकज भुजाडे, आकाश वानखडे, आदर्श तायडे, पवन गुरव, शुभम मानकर यांच्या हस्ते प्रथम संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानाला सुरुवात झाली.
रक्तदानासाठी गावातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. या शिबिरामध्ये ज्ञानेश्वर डांगे, अमन तायडे, सुरज सुलताने, गोपाल पुंडे, सुरेश भारसाकळे, दत्तात्रय बर्डे, निलेश सुलताने, बंटी सुलताने, किशोर सुलताने, अमोल गवई, अनंता बर्डे, गणेश पुंडे, विवेक सुलताने, निलेश डांगे, गणेश खाळपे, उमेश सुलताने, किसना मानकर, विकास निंबोळकर, धम्मपाल सुलताने, अमर बारहाते, शुभम उमाळे, आदित्य दळवी, गणेश निंबोळकार, ऋषिकेश काळे, सचिन सुलताने, शुभम गावंडे, गणेश भारसाकळे, विनोद हळे, हरीश उमाळे, शुभम तायडे, श्रीराम निंबोळकार, क्रिष्णा जानोकार, आसिफ पठाण, दत्ता भालतिलक, अनंता गावंडे, पंकज भारसाकळे, आकाश जमाव, विश्वजीत सुलताने, गणेश दहिभात, हरीश भारसाकळे, अमोल उगवेकर, गोपाल ताठे, शिवा लोणकर, राम हळे, स्वप्निल सुलताने, ज्ञानेश्वर पुंडे, राजेश सुलताने, उमेश भारसाकळे, मोहन डांगे, मंगेश डांगे अशा तब्बल 52 तरुणांनी शिबिरामध्ये रक्तदान केले.
जेमतेम 1500 लोकसंख्या असलेल्या पहुरपूर्णा या छोट्याशा गावामध्ये रक्तदान करण्यासाठी तरुणांमधील उस्फूर्त प्रतिसाद पाहून डॉक्टर आणि निस्वार्थ रूग्णसेवा परिवारातील पदाधिकाऱ्यांनी तरुणांचे कौतुक करून आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुणांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोहन डांगे यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…