पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- समता फाऊंडेशन लेव्हल ७ अंधरी मुंबई या अशासकीय संस्थेमार्फत येरवडा मध्यवती कारागृहातील बंद्यांसाठी त्वचारोग, नेत्ररोग या सारखी शिबिरे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करुन प्रशंसनिय उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार कारागृहातील बंदी बांधवांसाठी भारत सरकाराच्या राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरण यांचे ” आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रायलय यांचे “ई-श्रम कार्ड” ची ऑनलाईन नोंदणी समता फाऊंडेशन मुंबई यांचे मार्फत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दि.१२ मार्च पासून सुरु करण्यात आलेला आहे.
त्यानुसार येरवडा मध्यवती कारागृहातील २०० वंद्यांसाठी “आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रायलय यांचे ” ई-श्रम कार्ड” चे वाटप दि.१५ मार्च रोजी श्रीमती किरण बेदी सेवानिवृत्त भापोसे माजी राज्यपाल पाँडेचरी यांचे शुभहस्ते व श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग पुणे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरण यांचे “आयुष्यमान भारत कार्ड” व श्रम व रोजगार मंत्रालय यांचे “ई-श्रम कार्ड” ची गरज व फायदे तसेच ते वापरण्याची कार्यपध्दती इत्यादीची माहिती बंद्यांना देऊन अवगत करण्यात आले.
सदर उपक्रम अमिताभ गुप्ता भापोसे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमास सुनिल एन ढमाळ अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी डॉ. भाईदास ढोले उपअधीक्षक, श्रीमती पी. पी. कदम, आर ई गायकवाड उपअधीक्षक, एम. एच. जगताप उपअधीक्षक, आनंदा एस कांदे वरीष्ठ तुरुंगाधिकारी, शिवाजी पाटील तुरुंगाधिकारी, व्ही. के. खराडे, सुभेदार तसेच समता फाऊंडेशनचे प्रतिनिधी विश्वजित बागल, ऑपरेटर शरद खडसे यांनी कामकाज पाहीले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…