अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला: – श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर येथे बाल रुग्णाची होणारी गैरसोय थांबवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा उमेश इंगळे यांनी केली होती. शहरासह तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आधारवड असलेल्या निःशुल्क सेवा देणाऱ्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुणांची तपासणी होत असून बालरोग तज्ञ डॉक्टर नसल्याने शिशुसह बाल रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सुमारे दोन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासह मंडळ निहाय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यरत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजीवाहक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहेत यामध्ये काही रिक्त पदांचा तुटवडा आहे. रुग्णसेवेत याचा परिणाम होताना दिसत आहे आणि कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांचेचर सेवेचा ताण पडत असूनही आपली सेवा ही रुग्णांकरिता प्रामाणिकपणे देत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी प्रस्तुती विभाग कार्यरत असल्याने ह्याठिकाणी शिशुंची काळजी घेण्याच्या दृष्टीने बालरोग तज्ज्ञ डॉक्टर असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे व त्यांची २५ उपकेंद्र आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी निवेदन तथा तक्रार देऊन मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत डॉ. मोहम्मद जुबेर ईक्बाल, वैद्यकिय अधिकारी (बालरोग तज्ञ), यांची सद्यस्थितीत ल.दे. उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर जि. अकोला येथे वैद्यकिय अधिकारी (बालरोग तज) उपलब्ध नसल्यामुळे व सदर रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे बाल रुग्णांची गैरसोय होणार नाही.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…