परतूर शहरात ऑनलाईन अवैध मटका जुगाराचा मायाजाळ कारवाईची मागणी
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- शहरात अवैध मटका जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून या जुगारामध्ये तरुण पिढी यामध्ये गुरफटत चालले आहेत. मटका जुगारामध्ये अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
या अवैध मटका जुगारामुळे कमी वेळात श्रीमंत होण्याचा नादात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत परतुर शहरातील मलंगशाह चौकात बसून अवैध मटका घेणारे एजंट जागो जागी पसरलेली आहे. मोबाईल वरून ऑनलाईन अवैध मटक्याचे आकडे घेणे व पान टपऱ्यात बसून मटका चालवणारे परतुर शहरात पाहायला भेटत आहे तसेच गावात भाजीपाला मार्केट येथील मटका घेणारे एजंट अवैध मटका परभणीकर माफियाचा राईट हॅन्ड कॉर्नर मलंगशा चौक येथे बसून मोबाईल द्वारा जुगाराचे आकडे घेत आहे. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे.
त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था कायम टिकून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच परतुर तालुका पोलीस निरीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाइन अवैध मटका व हे चालवणारा मास्टर माईंड परभणीकर याचा शोध लावून कारवाई करावी अवैद्य मटका जुगार बंद करावा अशी मागणी परतूरच्या नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. पोलीस कारवाईची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809 अहेरी विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा धडाडू लागल्या असून याअंतर्गत…
*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल दिनांक ०९/१०/२०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील रामपूर,कन्नेपल्ली,खमनचेरु, या गावात कॉर्नर सभा घेण्यात…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात प्रचाराचा जोर…