महाविद्यालयाच्या जमिनीचे प्रस्ताव लौकरात लौकर शासनाकडे सादर करण्याची विनंती. माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांचे नेतृत्वात मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने निवेदन
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जागेचा प्रस्ताव शासनाकडे तसेच मेडिकल कौन्सिल कडे लवकऱ्यात लवकर पाठविण्यात यावा. याकरीता मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांच्या नेतृत्वात सुमारे 2000 हजार नागरिकांच्या सह्यानिशी चे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले.
मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे 400 बेड रुग्णालयाच्या दहा किलोमीटर अंतराचे आत असावे तसेच सलग 20 एकर जागा उपलब्ध असावी. असा नियम असल्याने यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सुयोग्य वाटणाऱ्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट व परिसरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा व भावनिक विषय असून लवकऱ्यात लवकर महाविद्यालयाची उभारणी व्हावी अशी जन भावना आहे. सदर महाविद्यालय हे हिंगणघाट परिसरातीलच नव्हे तर चंद्रपूर नागपूर व यवतमाळ लगतच्या ग्रामीण जनतेची सुद्धा गरज भागविणार आहे. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, व्यवसायिक, डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, फार्मसी असोसिएशनचे पदाधिकारी आदी विविध क्षेत्रातील सुमारे 2000 मान्यवरांनी सह्यानिशी निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, माजी प्राचार्य राजेंद्र सातपुते, मंगेश चवडे, नवल मानधनिया, रुपेश लाजुरकर आदी उपस्थित होते.
निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील: आमदार कुणावार जनता नर्सिंग स्कूल मध्ये मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार समीर कुणावर यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सहकार्य करावे, तसेच ४०० कोटीचा निधी शासनाकडून तातडीने मंजूर करून घ्यावा. अशी विनंती सुद्धा करण्यात आली होती. यावेळी आमदार कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालया करीता शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…