श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- वृक्ष हे मुख्यतः मुळावर आधारित असते, पक्षाला उड्डाण भरण्याला बळ पंखातून मिळते ,पशुचे जीवनच हे मुळात पोटावर असते, तर मानवाचे जीवन हे त्याच्या विवेकाने उठून दिसते. जर आपण आपल्या वृत्तीत, आचरणात ,वाणीत ,व्यवहारात, विवेकाला सोडून आचरण केले तर मारक्या जनावरात ,फूत्कारणाऱ्या सापात आणि आपल्यात फरक तो काय उरतो .याच विवेक शून्य वृत्तीवर आज किरणसुधाजी महाराज बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, मेघगर्जनाही गरजली जाते, म्हणून ती भयावह ठरत नसते. ती पुढे उद्भवणाऱ्या प्रसंगाची चाहूल देउन शुभ शकुन दर्शवते .तिच्या दूरवर पोहोचणाऱ्या आवाजाने कळून येते की, आपला पालन करता सुखदाता पर्जन्याचा राजा येउन बरसणार आहे. सुजलाम सुफलाम होणार आहे. जनता आबादी आबाद होणार आहे. जर हा नाही अवतरला तर काळ आवर्षणाचा येतो .धंदा मंदावतो, शेतकरी थंडावतो ,व सर्वसामान्य जनतेला हा काळ असाह्य ठरतो उलट पर्जन्य बरसला. धरती अंकुरली .सृष्टी हिरवीगार झाली. मयूराला नृत्याची लहर आली. ही किमया सिंचनाच्या पाण्याने झाली. पाण्यालाच जीवन म्हणून या सृष्टीत त्याची ओळख झाली याच प्रमाणे अशीच वाणी भगवंताची प्रभावी ठरली. ती कित्येक जीवांचा उद्धार करण्याला सहाय्यभूत ठरली. जशी कृरकर्मा चंड कौशीक याला चंड मुनीच्या रूपात ती बदलून गेली अशी वाणी ही सामर्थ्यवान आहे .जिच्या प्रभावाने मेघ कुमार हा राजकुमार संयमाचा मार्गाला प्रोत्साहित होतो वैराग्याने हा संयमित होतो. दिक्षाही पत्करतो मात्र भौतिक सुखाच्या अभावाने पहील्याच दिवशी रात्रभर तळमळतो त्यातुन दिक्षा सोडून देण्याचे ठरवतो हे पाहून भगवंत त्याला पूर्व जन्माची आठवण करून देतात पूर्व जन्मी हा मेरू पर्वतातील अरण्यात एक मंदबुद्धी हत्ती असतो. अचानक अरण्याला आगीने वेढले जाते. वनव्याने जंगल भडकते. सर्व प्राणी मात्र सैरावैरा धावतात मिळेल तो आधार शोधतात.आधाराची जागा पाहून हा हत्ती ही एका जागी पहुडतो खाज आली हे पाहून खाजवण्यासाठी एक पाय उचलतो. तेवढ्यात त्या ठिकाणी एक ससा येऊन बसतो हा पाय टेकवणार तो त्या ठिकाणी हा ससा आढळतो भूतदयेने त्याला वाचवण्यासाठी हा अडीच दिवसापर्यंत पाय उभा ताटकळत ठेवतो त्याने पाय अकडला जातो व हा खाली धाडकन पडतो या भूतदयेच्या पुण्याने या जन्मी तो राजकुमारातून साधूकडे परावर्तित होतो. मात्र किरकोळ रात्रभर मच्छराचा त्रास सहन होणे ही तुच्छ घटना याची भगवंताकडून त्याला जाणीव होते व त्याची त्यालाउपरती होते ही भगवंताच्या वाणीची किमया ठरते अशा वाणीला सामर्थ्य मिळवण्यासाठी चार गोष्टीची आवश्यकता पडते १)मौन २)कमी बोलने ,थोडेच उच्चारण३) असत्य वदन आणि ४)माधुर्यातून संभाषण या चार गोष्टीचा दैनंदिन जीवनात उपयोग केला तरच वाणीवर प्रभाव पडून माणसाचे जीवन सुसह्यच काय तर भगवान महावीरा प्रमाणे देवत्वाला प्राप्त होइल असे त्यांनी सांगितले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…