Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

विवेक सोडून वाणीतून असंबद्ध उच्चार करणे हे झाले मंदबुद्धीच्या जनावराप्रमाणे वागणे- साध्वी किरणसुधाजी महाराज.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 23, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
विवेक सोडून वाणीतून असंबद्ध उच्चार करणे हे झाले मंदबुद्धीच्या जनावराप्रमाणे वागणे- साध्वी किरणसुधाजी महाराज.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- वृक्ष हे मुख्यतः मुळावर आधारित असते, पक्षाला उड्डाण भरण्याला बळ पंखातून मिळते ,पशुचे जीवनच हे मुळात पोटावर असते, तर मानवाचे जीवन हे त्याच्या विवेकाने उठून दिसते. जर आपण आपल्या वृत्तीत, आचरणात ,वाणीत ,व्यवहारात, विवेकाला सोडून आचरण केले तर मारक्या जनावरात ,फूत्कारणाऱ्या सापात आणि आपल्यात फरक तो काय उरतो .याच विवेक शून्य वृत्तीवर आज किरणसुधाजी महाराज बोलत होत्या.


त्या म्हणाल्या, मेघगर्जनाही गरजली जाते, म्हणून ती भयावह ठरत नसते. ती पुढे उद्भवणाऱ्या प्रसंगाची चाहूल देउन शुभ शकुन दर्शवते .तिच्या दूरवर पोहोचणाऱ्या आवाजाने कळून येते की, आपला पालन करता सुखदाता पर्जन्याचा राजा येउन बरसणार आहे. सुजलाम सुफलाम होणार आहे. जनता आबादी आबाद होणार आहे. जर हा नाही अवतरला तर काळ आवर्षणाचा येतो .धंदा मंदावतो, शेतकरी थंडावतो ,व सर्वसामान्य जनतेला हा काळ असाह्य ठरतो उलट पर्जन्य बरसला. धरती अंकुरली .सृष्टी हिरवीगार झाली. मयूराला नृत्याची लहर आली. ही किमया सिंचनाच्या पाण्याने झाली. पाण्यालाच जीवन म्हणून या सृष्टीत त्याची ओळख झाली याच प्रमाणे अशीच वाणी भगवंताची प्रभावी ठरली. ती कित्येक जीवांचा उद्धार करण्याला सहाय्यभूत ठरली. जशी कृरकर्मा चंड कौशीक याला चंड मुनीच्या रूपात ती बदलून गेली अशी वाणी ही सामर्थ्यवान आहे .जिच्या प्रभावाने मेघ कुमार हा राजकुमार संयमाचा मार्गाला प्रोत्साहित होतो वैराग्याने हा संयमित होतो. दिक्षाही पत्करतो मात्र भौतिक सुखाच्या अभावाने पहील्याच दिवशी रात्रभर तळमळतो त्यातुन दिक्षा सोडून देण्याचे ठरवतो हे पाहून भगवंत त्याला पूर्व जन्माची आठवण करून देतात पूर्व जन्मी हा मेरू पर्वतातील अरण्यात एक मंदबुद्धी हत्ती असतो. अचानक अरण्याला आगीने वेढले जाते. वनव्याने जंगल भडकते‌‌. सर्व प्राणी मात्र सैरावैरा धावतात मिळेल तो आधार शोधतात.आधाराची जागा पाहून हा हत्ती ही एका जागी पहुडतो खाज आली हे पाहून खाजवण्यासाठी एक पाय उचलतो. तेवढ्यात त्या ठिकाणी एक ससा येऊन बसतो हा पाय टेकवणार तो त्या ठिकाणी हा ससा आढळतो भूतदयेने त्याला वाचवण्यासाठी हा अडीच दिवसापर्यंत पाय उभा ताटकळत ठेवतो त्याने पाय अकडला जातो व हा खाली धाडकन पडतो या भूतदयेच्या पुण्याने या जन्मी तो राजकुमारातून साधूकडे परावर्तित होतो. मात्र किरकोळ रात्रभर मच्छराचा त्रास सहन होणे ही तुच्छ घटना याची भगवंताकडून त्याला जाणीव होते व त्याची त्यालाउपरती होते ही भगवंताच्या वाणीची किमया ठरते अशा वाणीला सामर्थ्य मिळवण्यासाठी चार गोष्टीची आवश्यकता पडते १)मौन २)कमी बोलने ,थोडेच उच्चारण३) असत्य वदन आणि ४)माधुर्यातून संभाषण या चार गोष्टीचा दैनंदिन जीवनात उपयोग केला तरच वाणीवर प्रभाव पडून माणसाचे जीवन सुसह्यच काय तर भगवान महावीरा प्रमाणे देवत्वाला प्राप्त होइल असे त्यांनी सांगितले.

Previous Post

चपुणे शहर व परीसरात घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जाळयात त्याचेकडून १८० ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर मुददेमाल असा १० लाखाहुन अधिक मुददेमाल हस्तगत.

Next Post

येत्या सोमवार पर्यंत गोंडपिपरी-धाबा-पोळसा बस सेवा सुरू करा, अन्यथा बुधवारला रास्ता रोको आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
येत्या सोमवार पर्यंत गोंडपिपरी-धाबा-पोळसा बस सेवा सुरू करा, अन्यथा बुधवारला रास्ता रोको आंदोलन.

येत्या सोमवार पर्यंत गोंडपिपरी-धाबा-पोळसा बस सेवा सुरू करा, अन्यथा बुधवारला रास्ता रोको आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In