हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय येथून वसतिगृहात राहणाऱ्या बीएएमएस होऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आचल प्रमोद गोरे वय 23 वर्ष असे मृतक विद्यार्थीनीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळचे रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, 23 वर्षीय मृतक आचल गोरे ही विमलादेवी मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसच्या चौथ्या वर्षांची विद्यार्थीनी होती. 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेली. आज, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास तिच्या रूम मध्ये राहणाऱ्या रूम मैत्रिणीने तिला उठवले. पण आचल कोणताही प्रतिसाद देत नव्हती, त्यानंतर तिने वॉर्ड बॉय साहिल दसोडे याला मदतीसाठी बोलावले.
त्यानंतर त्यांनी मिळून आचलंला तात्काळ चंद्रपूर जिल्हा शासकीय रूग्णालय उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरानी आचलंची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…