राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने महायुतीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या जागा वाटपात पक्षाला चर्चेत सहभागी करून घेतले नाही, एकही जागा अद्याप दिलेली नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे असे जाहीर केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) याला विधानसभा निवडणुकीत साधी दखल घेण्यात येत नसल्याने आरपीआय चे नेते नाराज आहे. त्यामुळे महा युतीचा प्रचार न करण्याचा पक्षाच्या राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये असा निर्णय झाला असून याची कल्पना पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र पदाधिकारी बाळासाहेब जानराव, सरचिटणीस अॅड. मंदार जोशी, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर तसेच अशोक कांबळे, संजय सोनवणे, महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, विरेन साठे यावेळी उपस्थित होते. जानराव यांनी सांगितले की सन 2014 पासून आरपीआय भाजपबरोबर आहे. आता महायुतीमध्येही आहे. लोकसभेला आम्ही जागा मागितली, तर एकही जागा दिली नाही. आता विधानसभेला पक्षाध्यक्ष रामदास आठवले 12 जागा मागत होते. त्यांना साधे चर्चेतसुद्धा सहभागी करून घेतलेले नाही, जागा वाटपाचा शब्दही भाजप किंवा महायुतीतील अन्य घटक पक्ष काढायला तयार नाहीत. या सगळ्याचा रोष पक्षात आहे. फक्त आठवले यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले व पक्षाला अन्य काही नाही दिले तरी चालते असा युतीचा समज झाला आहे. हा समज आम्ही काढून टाकू.
भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार मिळून बनलेल्या महायुतीच्या एकाही उमेदवाराच्या प्रचारात आरपीआय चा कार्यकर्ता सहभागी होणार नाही. आठवले यांना याची माहिती दिली आहे. 26 ऑक्टोबर ही मुदत आम्ही दिली आहे. तोपर्यंत आमची दखल घेतली नाही तर मंत्री आठवले त्यादिवशी त्यांचा अंतीम निर्णय जाहीर करतील अशी माहिती जानराव यांनी दिली. डॉ. धेंडे, अॅड. जोशी यांनी सांगितले की पक्षाची ही एकप्रकारे फसवणूकच सुरू आहे. कार्यकर्ते ती सहन करणार नाहीत. आरपीआयची प्रत्येक मतदारसंघात मोठी निर्णायक मतपेढी आहे. ती बाजूला राहिल्यास काय होऊ शकते याचा धडा युतीला बरोबर मिळेल.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…