मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी वंदन करण्यासाठी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उत्सव समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेत, रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याचा संकल्प केला.
रक्तदान म्हणजे फक्त सेवा नसून ती आपल्याला समाजासाठी योगदान करण्याची संधी देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षण, समानता, स्वाभिमान आणि मानवतेच्या मूल्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांचा आदर्श आत्मसात करून समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी यावेळी केला.
याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, विजय तामगाडगे, दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, सिद्धार्थ मस्के, सुभाष सोयाम, पुरुषोत्तम कांबळे, नितीन भुते, झाडे बावाजी, सुरेश गायकवाड, सुशील घोडे, विपूल थूल, पंकज भट्ट,आकाश हुरर्ले, चेतन ढोरे, मयूर पाटिल आदी उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…