बॉलीवूड सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट भोवणार, पोलिसात तक्रार.

रुपेश उमराणी मुंबई ब्यूरो चीप
मुंबई :-
हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंग याचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर वायरल झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमातून टिकेची झोड उडवण्यात आली आहे. तर काही लोक ती त्याची मर्जी म्हणत त्याच्या न्यूड फोटोशूटचं समर्थन करत आहेत. यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असताना यात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप या FIR दाखल केलेला नाही. मात्र तक्रार दाखल झाल्याने आता हे न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीर सिंगला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरूनच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीर सिंगवर सरकून टीका केली होती.

अभिनेता रणवीर सिंह याचं हे न्यूड वादग्रस्त फोटोशूट समोर आल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच इतरही अनेक लोकांनी यावर टीका केली होती.

याउलट बॉलीवूड मधील काही मंडळी ही रणवीर सिंहच्या या न्यूड फोटोशूटच्या समर्थनार्थ उभी राहिली होती. त्याला योग्य वाटतं ते त्यानं केलं. तो त्यात कम्फर्टेबल असेल तर त्याने ते करावं. त्याने काय करावं आणि काय न करावं हे सांगणारे आपण कोण? अशी भूमिका अनेक बॉलीवूडच्या मंडळींनी घेतली होती. तसेच अनेक जणांनी या प्रकरणावर बोलण्यावर नकार दिला होता. मात्र देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत होत्या आणि आता हे प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण रणवीर सिंहला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. रणवीर सिंह त्याच्या पावर पॅक एनर्जीमुळे आणि जबरदस्त अभिनयामुळे नेहमीच चर्चात असतो, मात्र हे फोटोशूट जरा वेगळाच विषय ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढणार असे दिसून येत आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

15 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

15 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

16 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

16 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

16 hours ago