रुपेश उमराणी मुंबई ब्यूरो चीप
मुंबई :- हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंग याचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर वायरल झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमातून टिकेची झोड उडवण्यात आली आहे. तर काही लोक ती त्याची मर्जी म्हणत त्याच्या न्यूड फोटोशूटचं समर्थन करत आहेत. यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असताना यात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप या FIR दाखल केलेला नाही. मात्र तक्रार दाखल झाल्याने आता हे न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीर सिंगला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरूनच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीर सिंगवर सरकून टीका केली होती.
अभिनेता रणवीर सिंह याचं हे न्यूड वादग्रस्त फोटोशूट समोर आल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच इतरही अनेक लोकांनी यावर टीका केली होती.
याउलट बॉलीवूड मधील काही मंडळी ही रणवीर सिंहच्या या न्यूड फोटोशूटच्या समर्थनार्थ उभी राहिली होती. त्याला योग्य वाटतं ते त्यानं केलं. तो त्यात कम्फर्टेबल असेल तर त्याने ते करावं. त्याने काय करावं आणि काय न करावं हे सांगणारे आपण कोण? अशी भूमिका अनेक बॉलीवूडच्या मंडळींनी घेतली होती. तसेच अनेक जणांनी या प्रकरणावर बोलण्यावर नकार दिला होता. मात्र देशभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत होत्या आणि आता हे प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण रणवीर सिंहला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. रणवीर सिंह त्याच्या पावर पॅक एनर्जीमुळे आणि जबरदस्त अभिनयामुळे नेहमीच चर्चात असतो, मात्र हे फोटोशूट जरा वेगळाच विषय ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढणार असे दिसून येत आहे.