उत्सव करा हो!! पण असा उत्सव नको कि ज्याने इतरांना त्रास होणार.

लेखिका:✍️सुप्रिया ढोके, राह. नागपूर

मला आजपर्यंत कळाले नाही की इतके त्रासदायक कर्ण कर्कश फटाके आणि त्यातून निघणारी विषारी धूळ आणि धूर यांचा नेमका काय फायदा होतो जे प्रत्येक उत्सव, सण किंवा कार्यक्रम यांच्या शिवाय केलं जाऊच शकत नाही?? दुसरे म्हणजे अतिजास्त कर्ण कर्कश आवाज करून डीजे सोबत रंगबी रंगी लएडी बब्ल लावून काय सोंग केली जातात?? खरच यांची गरज असते काय प्रत्येक सणा करिता??म्हणजे हे सगळं सोंग नाही केली तर आपले सण साजरे नाही होणार असं म्हणणं होत काय? माफ करा मग ज्या घरी कोणी मरण पावतो त्याच्या मरणा ला हि असेच डीजे आणि मोठाली फटाके नक्कीच लावून गाजा वाजा करायला हवी कि नाही ?? अहो, जस तुमचे आनंद या सोंगाने द्विगुनी होत तसेच दुःख हि द्विगुनी करायला हवे की नाही??? नशीब!! त्या दिवशी तरी असली सोंग नाही करत नाही तर शांती हि कुठेच भेटली नसती या पृथ्वीतलावर असं मला तरी वाटते.

इथे गोष्ट फक्त दिवाळीची नाही बर का ! हि त्या प्रत्येकच उत्सवाची आहे ज्यात हे त्रास सहन शक्ती पलीकडे होऊन जात चाललंय. लोक म्हणतात आनंद साजरा करतो आम्ही, मी म्हणते की जितके तुम्ही पैसे अशा फटक्यात घालवत जे उडवून फक्त तुम्हाला काही क्षणच आनंद मिळतो पण सत्य हे असत कि तुम्ही काही आजार त्या सोबत आणता हे तुमच्या लक्षातच येत नाही या मूर्खतेला आपण आनंद म्हंटल तर कस वाटेल?

आपण जिथे राहतो ते घर असत त्यात म्हातारी माणसे हि असतातच न? काही तर माझ्या सारखी तरुण असून ही ह्या सगळ्याचा त्रास सहन करू शकत नाहीत. कारण काय तर प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ठ प्रकृती बनलेली असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो आणि मग ते पटकन आजारी पडत असतात जशी कि मी, कोरोनाची लस घेतल्यापासून प्रत्येक व्यक्ती ची एकच तक्रार येतांना दिसते पूर्वी सारखं तरतरी नाही वाटत लवकर आजारी पडते, दम लागतो, हाडे दुखतात, जरा सुद्धा फोडणीचा किंवा धुळीचा वास सहन होत नाही, अति आवाज ऐकणे होत नाही, हृद्याचे ठोके वाढायला येते, डोकं दुखते, वगैरे वगैरे अर्थातच सांगायचं हेच कि दोन वर्षे आपण पिंजऱ्यातला पक्षी बनून जे निसर्गावर उपकार करत सगळ्या प्रदूषणातून मुक्त केलं आता पुन्हा तेच प्रदूषण करून माती खाऊ नका, कारण आज जे कराल उद्या नक्कीच भोगावे लागणार मागील दोन वर्षात आपण प्रत्येक गोष्ट जवळून अनुभवली असेलच, सगळ्यांनीच आपल्या जवळची माणसे हि गमावली असेलच, तर मग त्यातून हि आपण काहीच शिकलो नसेल तर नवलच बरे ?

आयुष्य एकदाच मिळत हे माहित असून ही आपण निसर्गाला परत फेड म्हणून सुंदर आणि स्वच्छ पर्यावरण सुद्धा देऊ शकत नाही याच खूप दुःख वाटते.तासाभर साठी चा आनंद उत्सव हा कुणाच्या जीवावरही बेतू शकतो आणि पर्यावरण दूषित हि करू शकतो ह्याच जागरूक आणि सचेत नागरिक म्हणून मी तरी असे प्रदूषण न करण्याचा संकल्प घेऊन ते न चुकता दर वर्षी माझ्या कुटुंबा सोबत शांततेत दिवे, फुल, फळे, गोड -धोड वाटून साजरे करत असते यात कुणालाही कुठला त्रास होत नाहीच वरतून तीन दिवासाने वाळून गेलेली फुले हि माझ्या अंगणातील कुंड्यात प्रेमाणे त्याच सुकलेल्या फुलांची एक- एक पाकळी मोकळी करून माती मध्ये त्यांना पुरून त्यांची सुंदर रोपटी बनवते जी मोठी होऊन सुंदर फुलं देतात आणि आमच्या घराची शोभा वाढवतात सोबत निसर्ग हि आनंदित होतो.

बरं हे तर झाल माझ आणि माझ्या घरच उदाहरण पण तुम्हाला तरी वाटत काय माझ्या एकटीच्या संकल्पाने आपला परिसर किंवा हा निसर्ग वाचू शकतो?? नाही न ?मग दोन वर्षी जे शांती पूर्ण उत्सव साजरी केली तशीच आपल्या मुळे इतरांना आपल्या परिसरातील रुग्णांना, आजी – आजोबांना त्रास नाही होणार याची नक्कीच जाणीव ठेवून उत्सव साजरा केला गेला तर काय बिघडणार?? उलट सगळं वातावरण सुंदरच होणार हे नक्की. दवाखान्याच्या परिसरा जवळ तर अजीबात फटाके आणि डीजे बंद करायला हवी परंतु याच्या विरुद्धच चित्र बघायला मिळते किती दुःखाची गोष्ट आहे की रुग्ण त्यांच्या त्रासात असतात आणि बाहेर रस्त्याने कर्णकर्कश आवाजात गाणे वाजवत ज्यांचे शब्द कमी आणि दणके च आपल्या हृदया ला जोरा जोरात फटके मारल्या सारखे जाणवतात असला कुठला आनंद असतो काय??तुम्हीच विचार करा आणि ठरवा.

स्वतः तर आनंदी रहाच पण सोबत इतरांना ही आनंद वाटा अगदीच जास्त पैसा झाला असेल आपल्या खिशात मावत नसेल तर फटाक्याच्या स्वरूपात पैसा जाळून रस्त्यावर कचरा पसरवण्या पेक्षा एखादया गरिबाला त्या दिवशी दान करून पुण्य नक्की कमवू शकता यातून कुणाला त्रास तर होणार नाहीच उलट तुम्ही त्यांना जे उत्सव साजरे करायला मदत केली याच त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान आणि आनंद नक्कीच दिसेल बघा तर करून एकदा खरे।

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

12 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

23 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

23 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

23 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

23 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

24 hours ago