नागपूर: 300 देऊन केला 11 वर्षीय चिमुकलीवर नराधमाने केला बलात्कार, मग 9 नराधमांनी तब्बल महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार.

युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:-
नागपूर जिल्हा पुन्हा एक संतापजनक बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. 11 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर 9 नराधमांनी तब्बल महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार करून तिचे लचके तोडण्याचे धक्कादायक घटना नागपूर पासून 60 किलोमिटर अंतरावर असलेल्या एका खेडे गावातून समोर आली आहे. नराधम आरोपींनी बलात्कार करण्यासाठी पीडित चिमुकलीला 300 रुपये दिल्याचे पोलिसनी केलेल्या तपासातून समोर आले आहे..

अशी संतापजनक घटना उघडकीस येताच नागपूर जिल्हातील उमरेड जवळील या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. यांनतर पोलिसांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून बेळ्या थोकल्या आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. ही 11 वर्षीय शाळकरी मुलीवर गावातच राहणाऱ्या एका नराधमाने अगोदर बलात्कार केला. या नराधमाने तिला खोटे बोलून या मुलीला त्याच्या घरी नेले मग तिच्यावर बलात्कार केला. तसेच याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. तिच्या बरोबर काय होत आहे हे तिला त्या क्षणी काही समजायला आल नाही. त्याच्यासोबत त्याच्या इतर साथीदारांनी देखील या मुलीवर अत्याचार केला.

गावातील ओलखीच्याच व्यक्तीने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर या मुलीला धमकावले. याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारु अशी धमकी देखील आरोपीने दिली. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला 300 रुपये देखील दिले. हे पैसे मी दिलेत असे तुझ्या घरच्यांना सांगू नकोस. हे पैसे मला सापडले आहेत असे सांग. अजून काही लोक येणार आहेत. त्यांनाही असेच करु दे ते देखील तुला पैसे देखील असे आरोपीने सांगीतले. यानंतर नऊ नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचे आई-वडील मजूर आहेत.

ही संतापजनक घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे गावातील मुली आणि महिलांमध्ये दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तात्काळ नराधम आरोपींना अटक केली.

रोशन करगावकर वय 29 वर्ष आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर वय 40 वर्ष, प्रेमदास गाठबांधे वय 38 वर्ष, राकेश महाकाळकर वय 24 वर्ष, गोविंदा नाटे वय 22 वर्ष, सौरभ उर्फ ​​करण रिठे वय 22 वर्ष नितेश फुकट वय 30 वर्ष, प्रद्युम्न करूटकर वय 22 वर्ष आणि निखिल उर्फ ​​पिंकू नरुळे वय 24 वर्ष अशी आरोपींची नावे आहेत. या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन करगावकर हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो. रोशन करगावकर हा एका हत्या प्रकराणातील आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने या अत्याचाराची कबुली दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश होता याविषय पोलिस अधिक तपास करत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

4 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

15 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

16 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

16 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

16 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

16 hours ago