युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- नागपूर जिल्हा पुन्हा एक संतापजनक बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. 11 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर 9 नराधमांनी तब्बल महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार करून तिचे लचके तोडण्याचे धक्कादायक घटना नागपूर पासून 60 किलोमिटर अंतरावर असलेल्या एका खेडे गावातून समोर आली आहे. नराधम आरोपींनी बलात्कार करण्यासाठी पीडित चिमुकलीला 300 रुपये दिल्याचे पोलिसनी केलेल्या तपासातून समोर आले आहे..
अशी संतापजनक घटना उघडकीस येताच नागपूर जिल्हातील उमरेड जवळील या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. यांनतर पोलिसांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून बेळ्या थोकल्या आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. ही 11 वर्षीय शाळकरी मुलीवर गावातच राहणाऱ्या एका नराधमाने अगोदर बलात्कार केला. या नराधमाने तिला खोटे बोलून या मुलीला त्याच्या घरी नेले मग तिच्यावर बलात्कार केला. तसेच याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. तिच्या बरोबर काय होत आहे हे तिला त्या क्षणी काही समजायला आल नाही. त्याच्यासोबत त्याच्या इतर साथीदारांनी देखील या मुलीवर अत्याचार केला.
गावातील ओलखीच्याच व्यक्तीने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर या मुलीला धमकावले. याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारु अशी धमकी देखील आरोपीने दिली. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला 300 रुपये देखील दिले. हे पैसे मी दिलेत असे तुझ्या घरच्यांना सांगू नकोस. हे पैसे मला सापडले आहेत असे सांग. अजून काही लोक येणार आहेत. त्यांनाही असेच करु दे ते देखील तुला पैसे देखील असे आरोपीने सांगीतले. यानंतर नऊ नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचे आई-वडील मजूर आहेत.
ही संतापजनक घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे गावातील मुली आणि महिलांमध्ये दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तात्काळ नराधम आरोपींना अटक केली.
रोशन करगावकर वय 29 वर्ष आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर वय 40 वर्ष, प्रेमदास गाठबांधे वय 38 वर्ष, राकेश महाकाळकर वय 24 वर्ष, गोविंदा नाटे वय 22 वर्ष, सौरभ उर्फ करण रिठे वय 22 वर्ष नितेश फुकट वय 30 वर्ष, प्रद्युम्न करूटकर वय 22 वर्ष आणि निखिल उर्फ पिंकू नरुळे वय 24 वर्ष अशी आरोपींची नावे आहेत. या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन करगावकर हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो. रोशन करगावकर हा एका हत्या प्रकराणातील आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने या अत्याचाराची कबुली दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश होता याविषय पोलिस अधिक तपास करत आहेत.