सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली:- अगोदरच गरीब, कामगार, शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे. त्यात आता सरकारी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी लाच द्यावी लागत असेल तर यापेक्षा महाराष्ट्रासाठी मोठ दुर्दैव आहे मान शरमेनं मान खाली जाणारी बाब आहे. जत तालुक्यातील बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असलेल्या उपचारासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात लाचलुचपत विभागाने पकडले आहे. डॉ. प्रमोद मारूती कांबळे वय 46 वर्ष, रा. शिवाजी पेठ, जत असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. जत पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिळूर येथे प्रमोद कांबळे हे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एका व्यक्तीला व त्याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी मोफत उपचार असतानाही एक हजार रुपयांची मागणी केली होती. पैशाची मागणी केल्याने संबंधित तक्रारदार याने सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वैद्यकीय अधिकारी कांबळे यांना रंगेहात पकडले.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक, सुजय घाटगे, दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, कलगुटगी, अजित पाटील, सलिम मकानदार, रविंद्र धुमाळ, बाळासाहेब पवार या पथकाने कारवाई केली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…