सामुद्रपुर पोलीस कारवाई करत 1,29,700 रूपयाचा माल जप्त.
✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्र्पुर:- मुखबिरचे खात्रीशीर खबरेवरून पोलीस .हवा. अरविंद येनुरकर व त्यांच्या पोलीस टीम यांनी दोन आरोपीतांवर मौजा जाम, नागपुर कडुन जामकडे येणा-या एन.एच. 44 वर महामार्ग पोलीस चौकी समोर सापळा रचुन दारूबंदीबाबत पोलीस .रेड केला असता, यातील नमुद आरोपीतांना समोर पोलीस असल्याचे दिसताच, मोटर सायकलसह पळुन जात असतांना, त्यांची मोटर सायकल डिव्हायडर ला घासल्याने, त्यांचे मोटर सायकलवरील नियत्रंण सुटल्याने, दोन्ही आरोपी 1) अभिषेक मोरेश्वर पवार, रा. गणेशपुर पारधी बेडा, ह.मु. काजी वार्ड हिंगणघाट 2) राकेश शंकरसिंग चंदेल, रा. खंडोबा वार्ड हिंगणघाट हे मोटर सायकल सह रोडवर पडले. शिताफीने त्यांचे जवळ जावुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे जवळ असलेल्या थैल्याची पाहणी केली असता, त्यात असलेल्या देशी दारूने भरलेल्या 144 शिशा पैकी 14 शिशा फुटलेल्या असुन, 130 शिशा सुस्थितीत असल्याचे दिसुन आल्याने, मोक्कावरच जप्ती कार्यवाही करून दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन देशी दारूचा शिशा किं. 1,29,700 रू चा माल जप्ती करून, पो.स्टे. समूदपूर आरोपीतांविरूध्द 20/2023 कलम – 65(अ)(ई), 77(अ) 83 म.दा.का. सहकलम 3(1)181,130/177 कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे।
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.शि. वैभव चरडे, आलोक हनवते यांनी केली.