प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आम आदमी पार्टी, वर्धा शहर महिला आघाडी अध्यक्ष तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजुताई जिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे वर्धा जिल्हाध्यक्ष अजय घंगारे यांचे प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे.
आम आदमी पक्षाच्या वीज, पाणी, आरोग्य बाबत धोरणाने आकृष्ट झालेल्या बहुसंख्य लोकांचा हळूहळू अपेक्षा भंग होत असून आरक्षण, ओबीसी जनगणना, मुस्लिम व इतर अल्पसंख्यांकांबाबत आपचे भाजपधार्जिणे धोरण यामुळे मुस्लिम आणि मागास घटकात आम आदमी पक्षाबद्दल नाराजी झपाट्याने वाढत असून पुढील काळात मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाहेर पडतील असे यावेळी अंजुताई जिंदे यांनी बोलून दाखविले.
यावेळी अजय घंगारे यांनी अंजुताई यांचे पक्षात स्वागत करून त्यांना लवकरच योग्य जबाबदारी देऊन त्यांचा सन्मान राखल्या जाईल असे सांगितले, याप्रसंगी सिद्धार्थ डोईफोडे, संतोष भगत, वसंत मुरारकर, सुषमा दुपारे, बाबाराव वाघमारे , संजय हाडके, श्रीपाल कांबळे इ. अनेक पदाधिकाऱ्यांनी अंजुताई यांचे अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348