तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वरोरा:- भाजपाच्या लोकाभिमुख कार्यावर विश्वास व्यक्त करित पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत यांच्या प्रमुख उपस्थितीत वरोरा येथील विश्रामगृहात अनेक कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी पक्षाचा दुपट्टा घालून इंजि. मारोतराव कोरडे, सय्यद शेख, फिरोजखान पठाण, इकबाल शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे स्वागत करुन पक्षकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी सर्वश्री विजय राऊत, डॉ. भगवान गायकवाड, सुरेश महाजन, करण देवतळे, इंजि. ओम मांडवकर, राजेश दोडके, पदमाकर दुधलकर, गजानन राऊत, धनंजय पिंपळशेंडे, सायराताई शेख, शुभांगीताई निंबाळकर, गोपाल वर्मा, अन्य मान्यवर उपस्थित होते.