युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ मोबा.नंबर 9923266442
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर तालुका (ग्रा.) च्या कार्यालयाचे रविवार दिनांक ८ जानेवारीला उदघाटन विदर्भ शाहीर कलाकार परिषदचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे, कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे यांच्या हस्ते पार पडले. त्याचप्रमाणे विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर तालुका (ग्रा) ची कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सभासदास नियुक्ती पत्र विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूरचे जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले.
धामणा (लिंगा) तालुका नागपूर प्रभाग क्रमांक १ मधील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात घेण्यात आलेल्या कार्यक्रमास मंदीराचे विश्वस्त कवडूजी टोंगे, नागोरावजी निखाडे, लिलाधरजी खाडे प्रामुख्याने उपस्थित होते.पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले ह्यावेळी वैष्णवी पेटकर,पूर्वा थुटूरकर,वैभवी पेटकर यांनी गीत गावून केले. मंचावर सर्व पाहूणे मंडळींचे स्वागत हार घालून केले.
याप्रसंगी कार्यक्रमास सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून शिवाजी महाराज,सावीत्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे, कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, जिल्हा सरचिटणीस अरुण वाहने, मानधन समितीचे माजी सदस्य मनोहर धनगरे, यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर तालुका (ग्रा) धामणा (लिंगा) कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रास्ताविक नागपूर तालुका अध्यक्ष शाहीर गौरीशंकर गजभिये यांनी केले तर सुत्र संचालन महासचिव संजय खांडेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा सरचिटणीस अरुण वाहने, जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांची प्रबोधनात्मक भाषणे झालीत. याप्रसंगी अनेक कलावंत उपस्थित होते.
विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर तालुका (ग्रा) कार्यकारणी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आले.यात शाहीर गौरीशंकर गजभिये अध्यक्ष, शाहीर दिलीप आस्कर उपाध्यक्ष, विजय तुरनकर कोषाध्यक्ष, संजय खांडेकर महासचिव, मोरेश्वर आस्कर सचिव, पांडुरंग टोंगे संघटक, चंदू नागपुरे सहसंघटक,संजय वानखेडे सहसचिव, त्याचप्रमाणे धर्मपाल गजभिये, रंजना खाडे, मंजुषा बनकर, रामचंद्र इंगळे, जिजाबाई डोंगरे , निर्मला मोरे ,शुभम कडू, मथुरा मनोहरप्रसाद पटेल, दिगंबर मासुरकर इत्यादी कार्यकारिणी सदस्यांना जिल्हाध्यक्ष दयाल कांबळेच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाहीर गौरीशंकर गजभिये, समाजसेवक संजय खांडेकर ,जेष्ठ कलावंत दिलीप आस्कर,लिलाधर खाडे, मोरेश्वर आस्कर, मिलिंद गजभिये,निर्मल खांडेकर,शंकर कदम, तुषार उके, यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन चंदु नागपूरे यांनी केले.