✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
मोब 9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे रांजणगाव व चाकण एमआयडीसी मधील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल ९ जानेवारी २०२३ रोजी मंत्रालय, मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये विविध प्रश्नांचा मंत्रिमहोदयांनी निपटारा केला.
यावेळी चाकण एमआयडीसीमधील प्रकल्प बाधितांना रखडलेला पंधरा टक्के परतावा व मोबदला मिळावा, प्रकल्प बाधित कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घ्यावे, कमी दराने मोबदला मिळालेल्या काही शेतकऱ्यांना चालू बाजार भावानुसार संपादनाचा मोबदला अदा करावा, तसेच वेताळे, शिंदे व भांबोली या ग्रामपंचायतींनी मागणी केल्यानुसार गावच्या विकासासाठी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एमआयडीसीने जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या यावेळी केल्या.
त्याचप्रमाणे रांजणगाव एमआयडीसी मधील एन्व्हायरो पावर लिमिटेड कंपनीने रांजणगाव गणपती येथील कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कारेगाव येथील ८७ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अदा करण्यात यावा, कर्डिलेवाडी येथील बागायतदार शेतकऱ्याची शेतजमीन संपादनातून वगळण्यात यावी आदि विषयांवर सविस्तर पत्रव्यवहार व चर्चा झाली. यासह खेड सेझमधील पाबळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के उठविण्याचे मंत्रिमहोदयांनी आश्वासन दिले होते ते तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा मोकळा करावा अशी आग्रही मागणी केली.
या सर्व विषयांवर मंत्रि महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या खाजगी सचिवांना प्राधान्याने कारवाई करण्याची सूचना दिल्या. सदरच्या बैठकीत उद्योग मंत्री व शेतकऱ्यांची भेट घडवून आणत अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
या बैठकीस माझ्यासमवेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, मा.जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संघटक निलेश पवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख मच्छिंद्र कदम, युवासेना तालुकाप्रमुख विष्णू वाळके, जिल्हाचिटणीस वैभव ढोकले, शिंदे गावचे सुनील देवकर, दत्तात्रय टेमगिरे, सुनील घनवट, निलेश पानमंद, भांबोलीचे सरपंच काळूराम पिंजन, शरद निखाडे, निघोजे येथील संदीप येळवंडे, कुलदीप येळवंडे, निलेश आंद्रे, विष्णू बेंडाले, बाळासाहेब येळवंडे, संतोष येळवंडे, अमित येळवंडे, संजय जामदार, खालुम्ब्रे येथील विलास बोत्रे, कारेगावचे शरद नवले, शिवाजी नवले, शांताराम तळेकर, सिताराम पाचंगे, भाऊसाहेब नवले आदी उपस्थित होते.