अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-10 जानेवारी:- सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील शाळेचे वार्षिक क्रीडा संमेलन नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पंचायत समिती सावनेरचे गटशिक्षणाधिकारी विजयजी भाकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मारुती मुळूक पोलीस निरीक्षक सावनेर, अविनाश प्रसाद सब एरिया मॅनेजर डब्लूसीएल सावनेर, प्रभाकररावजी डहाके पाटील अध्यक्ष श्री.ताजुद्दीन बाबा ट्रस्ट वाकी उपस्थित होते. तर विशेष प्रमुख पाहुणे म्हणून धैर्यशील छोटे सचिव टग ऑफ वार असोसिएशन नागपुर व योगेश पाटील मॅनेजर क्रीडा संकुल सावनेर उपस्थित होते.
या वार्षिक क्रीडा संमेलना टग ऑफ वार, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो अश्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ.अशोक जीवतोडे अध्यक्ष श्रीलीला बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर, श्रीमती डॉ. प्रतिभा जीवतोडे, सचिव श्रीलीला बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर, रत्नाकरजी डहाके पाटील संचालक सावनेर पब्लिक स्कूल, ममता अग्रवाल (सी बी एस ई बोर्ड) प्राचार्यां व वैशाली देशपांडे ( स्टेट बोर्ड) प्राचार्यां यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या वार्षिक क्रीडा संमेलनाच्या सफल आयोजन करिता शाळेचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत कोमुजवार, क्रीडा शिक्षिका ज्योती कोहाड, मंगला जोगी, अमोल जीवतोडे, प्रफुल नारनवरे, योगिता घोरमारे, पायल सूर्यवंशी, दिनेश निखाडे, योगिता आसोले, जयश्री पुरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348