अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत नांदागोमुख येथील गोमुख विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे.
सदर परीक्षेत सोनाली बंडुजी बल्की हिने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला तर समिक्षा सुभाष मिरचे हिने जिल्ह्यातून तृतीय स्थान प्राप्त केले. तसेच लोकेश बंडू मिलमिले, रीतिशा विजय ढीमोले,गिरीश धनराज हिंगाणे, रोहित श्रावण बोधाने, अनुशा अरविंद मिरचे, कुणाल बंडू बल्की, टिंकु कृष्णदास गजभिये आणि प्रविण खुशाल पोतराजे असे एकूण १० विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.नेमराज मोवाडे,सचिव प्रा.दिनकर जिवतोडे, निवृत्त मुख्याध्यापक अशोक डोंगरे, मुख्याध्यापक दीपक वासनिक,ओमप्रकाश मोवाडे सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडीलासह मार्गदर्शक शिरीष रंडखे,अनिता घोरमारे व अमोल महाजन यांना दिले.