अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील सावळी मोहोतकर येथे ओव्हरलोड अवैध वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत.चेक पोस्ट वाचविण्याच्या नादात कमी क्षमतेच्या रस्त्यावरून अवजड वाहतूक केली जाते.याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. सततच्या अवजड वाहतुकीमुळे अपघातासह इतरही समस्या वाढलेल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबी कडे तीळ मात्र सुद्धा लक्ष नाही. अवैध्य वाहतुकीवर आळा घालण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांना निवेदन देण्यात आले.
सावनेर तालुक्यातील सावळी (मो ) गावामधून चेक पोस्ट वाचवण्याच्या दृष्टिकोनातून 8 टन क्षमता असलेल्या रोड वरून 20 टन क्षमतेचे वरील वाहनाची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याने रस्ता संपूर्णपणे खराब झालेला असून अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.7 जानेवारीला जड वाहनाच्या धडकेने विद्युत खांबाच्या तारा तुटून 3 तास विद्युत पुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला. गावकरी लोकांनी पोलिस तक्रार केली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन गुन्हा दाखल केला. या अगोदर पण ट्रकच्या धडकेने विद्युत पोल पडल्यामुळे 5 दिवस गावातील विद्युत पुरवठा बंद होता तेव्हा पणअंधारात राहावे लागले होते. वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. ट्रक चालक रस्ता खराब असल्यामुळे शेतातून गाडी टाकून उभ्या पिकाचे नुकसान करतात. जड वाहतूक बंद करून गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आंदोलन करून रस्ता बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. या आशियाचे निवेदन उपविभागीय अधिकारी सावनेर यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना भाजपा नेते तुषार उमाटे दिगंबर सुरुतकर, हरिष मोहतकर, नाना माङेकर, चक्रधर मोहतकर, चिंतामण दिङमीसे, काशिराव मोहतकर, रवींद्र काकङे, प्रशांत जिवतोङे व गावकरी मंडळी उपस्थित होते.