नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबईच्या उपनगर असलेल्या मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरीकान साठी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. येथे 12 व 13 जानेवारीला पाणी पुरवठा होणार नाही.
महानगर पालिका द्वारा दिलेल्या माहितीनुसार सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, मिरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी जल शुद्धीकरण केंद्र, जांभूळ येथे तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने मिरा-भाईंदर शहरास एमआयडीसी प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा गुरुवार दि.12/01/2023 रोजी रात्री 12.00 ते शुक्रवार दि.13/01/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत (24 तासाकरीता) बंद राहणार आहे. तसेच स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
तरी एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होईल. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे.
शरद नानेगांवकर, कार्यकारी अभियंता (पा.पु. व मलनि) मिरा-भाईंदर महानगरपालिका