अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं.9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील कोदेगांव ग्राम पंचायत येथे मंगळवार ला उपसरपंच पदाकरिता पार पडलेल्या निवडणुकीत भाजप समर्थित गटाचे प्रफुल किशोर ठाकरे हे विजयी झाले असुन त्यांनी काँग्रेस समर्थित गटाचे कैलास पोटोडे यांचा त्यांनी तीन मतांनी पराभव केला.
कोदेगांव ग्राम पंचायत निवडणुकीत भाजप समर्थित गटाच्या सरपंच संगीता रविंद ऊईके विजयी झाल्या होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक पार पडली. निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून डंभारे व ग्राम पंचायत सचिव माधुरी खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रफुल किशोर ठाकरे यांनी एकुन 5 मते घेऊन उपसरपंचपदी विजय संपादन केला.
कोदेगाव ग्रामपंचायत मध्ये 1 सरपंच व 7 सदस्य अशी एकुन 8 सदस्यांची कार्यकारणी आहे. उपसरपंच पदाकरिता भाजपचे प्रफुल किशोर ठाकरे तर काँग्रेसकडुन कैलास पोटोडे यांनी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत भाजपचे प्रफुल किशोर ठाकरे यांना 5 मते तर काँग्रेसचे कैलास पोटोडे यांना 2 मते मिळाली तर 1 मत पञिका कोरी आढळुन आली.
या निवडणुकीत उपसरपंच पदी भाजपचे प्रफुल किशोर ठाकरे हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे कैलास पोटोडे यांचा 3 मतांनी पराभव केला.
उपसरपंच पदी प्रफुल किशोर ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल सरपंच संगिता रविंद्र ऊईके तसेच ग्राम पंचायत सदस्य व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348