शेतकरी हक्कापासून वंचित, कुटुंबियांच्या पालन पोषणाची काय?
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यांतील मौजा मूर्ती येथील शेतकऱ्यांची शेती विमानतळासाठी अधिग्रहण करण्यात येत आहे. पण या परिसरातील अधिग्रहण करण्यात येत असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदल्या बदल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मौजा मूर्ती गावातील भू क्रमांक 112 मधील सर्व शेजाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले.
या निवेदनात शेतकऱ्यांनी असे म्हटले आहे की, भू क्रमांक 112 पैकी एक मधील अतिक्रमण धारक शेतकरी असून विमानतळ करिता आमचे ताब्यातील जमीन भूसंपादित होत असल्यामुळे मोबदला मिळवून देण्यासाठी विनंती अर्ज करत निवेदन देत आहोत.
मुर्ती भु क्रमांक 112 ही सरकारी जमीन असून त्याच्यावर आमचा मागील 60 वर्षापासून वडिलोपार्जित ताबा असून आम्हा प्रत्येकांचे ताब्यात आराजी दोन हेक्टर जमीन आहे. त्या शेतात आम्ही दरवर्षी तूर, ज्वारी, कापूस इत्यादी पिकाचे उत्पादन घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित आहे तसेच या जमिनीचे आम्हाला पट्टे देण्यात यावे म्हणून यापूर्वी वेळोवेळी शासनाकडे अर्ज केलेले असून हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्यात काही लोकांना शासनाकडून पट्टे सुद्धा देण्यात आले आलेले आहे. परंतु आम्ही आमचे हक्कापासून वंचित आहो असे असताना सदर जमीन शासनामार्फत विमानतळा करिता भूसंपादित करण्यात आलेली आहे. आम्ही सदर शेत जमीन झाडे झुडपे तोडून आम्ही घाम गाळून सुपीक केलेली आहे व यात आम्ही हजारो रुपये लावून अनेक वर्षापासून जमिनीची कास्त व मशागत करीत आहोत या दरवर्षी आम्ही भरपूर पैसा खर्च करीत आहो परंतु दरवर्षीच्या ना पीके मुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहोत अशा परिस्थितीत सदर जमीन भूसंपादित झालेले असून सातबारा रेकॉर्डला सरकारी जमीन अशी नोंद असल्याने आम्ही मोबदला मिळण्यापासून वंचित आलेले आहोत तसेच आमचे माहिती व ताबा असल्याबाबत आम्ही साक्ष पुरावे देण्यात तयार आहोत व आमच्याकडे दंड भरल्या बाबत पावत्या सुद्धा आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलांना न मिळाल्यास आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. भविष्यात आमचे मुलाबाळाचे शिक्षण कुटुंबाचे पालन पोषण असे करावे हा फार मोठा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झालेला आहे. आम्हास दुसरी कुठलीही शेत जमीन नाही तसेच आम्हास शेती शिवाय दुसरा कोणताही व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आम्हास जमिनीचा मोबदला देण्यात यावा अन्यथा इतर जवळच्या शासकीय जमिनीपैकी प्रत्येक दोन हेक्टर जमीन आम्हास कायमस्वरूपाची पट्ट्याने देण्यात यावे. तसेच या जास्तीत जास्त आदिवासी अनुसूचित जातीचे लोक आहेत करिता विनंती आहे की, आम्हास सादर जमिनीचा मोबाईलला मिळून द्याल. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना अर्जाद्वारे पुरावे सादर केले. यावेळी शिवसेना प्रमुख शाखा मूर्ती सुरज नककोलवारसह अतिक्रमण धारक शेतकरी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348