श्याम भुतडा, बिड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातील केज तालुक्यातील काळेगावघाट येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील राहणाऱ्या 34 वर्षीय तरूणाने बेरोजगारीला कंटाळून आपल्याच राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे मृताचे तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काळेगावघाट येथील दयानंद हरिश्चंद्र गाताडेने डी.एडचे शिक्षण घेतले होते. तो मागील काही वर्षांपासून शिक्षकाच्या नोकरीच्या शोधात होता. पण नोकरी मिळत असल्याने तो हताश झाला होता. शेवटी बेरोजगारीला कंटाळून दयानंदने टोकाची भूमिका घेतली आणि सोमवारी दुपारी घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच केज पोलिस स्टेशनेचे कर्मचारी घटनस्थळी दाखल झाले, त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला. मंगळवारी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश रामचंद्र गाताडे यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348