राहुल फुंदे, शिर्डी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शिर्डी:- साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त श्री. राजेश्वर यांनी आपले फर्म साई कृपा वेंचरच्या नावे श्री साईबाबा संस्थानला मेडीकल फंडकरीता रुपये २५ लाखांचे ०४ डिमांड ड्राफ्ट असे एकुण ०१ कोटी रुपये देणगी दिली असून सदर देणगीचे डिमांड ड्राफ्ट संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केले.
तसेच हैद्राबाद येथील ओम श्रीराम बिल्डर्सचे श्री. सुभ्बा रेडडी हे त्यांच्या वाढदिवासा निमित्त श्री साईबाबा हॉस्पिटलकरीता सुमारे ४० लाख रुपये किंमतीचे एक्सरे मशिन देणगी देणार असल्याचे ही श्री.राजेश्वर यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी संस्थानचे मुख्यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे उपस्थित होते.
याबरोबरच चेन्नई येथील देणगीदार साईभक्त श्री.व्ही.जितेंद्र यांनी ५४४ ग्रॅम वजनाची २७ लाख ७७ हजार ६६४ रुपये किंमतीची सोन्याची आरती श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348