संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील पाचगाव येथे राजमाता जिजाऊ ची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने मुख्य चौकात राजमातेच्या प्रतिमेला अभिवादन करून स्वराज्याचा हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ग्रा. प सदस्य मनोज कुरवटकर, माजी उपसरपंच गोपाल जंबुलवार, जेष्ठ नागरिक नामदेव पावडसकर, संजय बोढे, रुपेश गेडेकर, संजय भसाखेत्रे, बंडू डोंगे, किशोर भोयर, गुलाब भिवनकर,सुभाष जीवतोडे,राऊजी झाडे, मारोती भोयर, प्रकाश सातपुते, युवासेना पाचगावचे पदाधिकारी संदीप घ्यार, सुनील गौरकार, रुपेश पुलगमवार, विजय भोयर, उदय नुलावार, महेश काकडे, गणेश भोयर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348