सचिन पावरा जळगांव प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वैजापूर (चोपडा):- आज ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय वैजापूर येथे या महाराष्ट्रामधील स्वराज्याला उभारी देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची 159 वी जयंती लोक नियुक्त सरपंच दत्तरसिंग पावरा व उपसरपंच विद्याबाई बारेला हस्ते पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून साजरी करण्यात आली.
सदर प्रसंगी ग्रामसेवक रुबिना तडवी मॅडम, क्लर्क राजू पिंप्राळे, डॉ.सुनील बारेला, निलेश सोनवणे, आशा वर्कर वंदना पाटील, बंसरी बारेला, हर्षाली बारेला, सचिन पावरा, दीपक ढोले व इतर नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348