नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या प्रयत्नांना मिळाले यश..!!
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- नगरपंचायत अंतर्गत 55 कंत्राटी सफाई कामगारांना 2 महिन्यांचे थकीत वेतन मिळावे ह्यासाठी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले होते. त्या कंत्राटी सफाई कामगारांच्या आंदोलनाला यश आले आहे.
अहेरी नगरपंचायत प्रशासनाने थकीत वेतन त्वरित देण्याचे मान्य केल्यावर सदर कामबंद आंदोलन संपविण्यात आले होते. कंत्राटी सफाई कामगारांच्या ह्या आंदोलनाची अहेरी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेत थकीत वेतन देण्याची कारवाई सुरू केली असुन येत्या 2 दिवसांत सर्व सफाई कामगारांना 2 महिन्याचे थकीत वेतन मिळणार आहे. तसेच समोर ही सफाई कामगारांना वेतन नियमित वेळेवर देण्याचे ही मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे अहेरी नगरपंचायत सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348