डॉ. आदित्य सारडा यांच्याकडे बीड जि. म. सह. बँकेच्या अध्यक्षपदाचा अनुभव आहे. त्यांच्या काळात सर्वात जास्त पीकविमा बीड जिल्हा बँकेने भरून घेतला. त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. शासनाने शेतविम्याबाबत बीड पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आहेत. जर डॉ. आदित्य सारडा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. शुक्रवारी अध्यक्षांसह इतर पदाधिकारी निवडले जाणार अध्यक्षपदासाठी आदित्य सारडा दावेदार आहेत. आता या बँकेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान नूतन पदाधिकाऱ्यांसमोर आहे.
दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला. बँकेच्या जुन्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले, त्यामुळे ठेवीदार, सभासदांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला. बँकेच्या काही ठेवी गेल्या. पण सुभाष सारडा यांनी सभासदांना विश्वास दिला आणि बँकेचे डिपॉझिट पुन्हा वाढले. मात्र प्रशासकांना हे टिकविता आले नाही. प्रशासकांनी बँक सावरण्या ऐवजी जणू काही अवसायकाची भूमिका घेतली, स्वतः पत्रव्यवहार करून निर्बंध ओढवून घेतले व त्यामुळे बँकेवर निर्बंध लावले गेले. याचा त्रास मात्र ठेवीदारांना भोगावा लागला. बँकेतून अनेकांनी ठेवी काढल्या. तसेच त्या काळात आकस भावनेतून झालेल्या बदल्या, यामुळे काही कर्मचारी रजेवर गेले तर काहींनी नोकरी सोडली.
या सर्व परिस्थितीत बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. सारडा यांना विरोध करू पाहणाऱ्यांना उमेदवार देखील देता आले नाहीत. सभासदांनी आपण सुभाष सारडा यांच्याच सोबत आहोत हे परत दाखवून दिले.