श्याम भुतडा, बिड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज धोकादायक बीड: सामाजिक उन्नतीसाठी तसेच जनतेचा आवाज सभागृहात बुलंद करण्यासाठी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेमध्ये किसान पुत्र श्रीकांत गदळे यांना नियुक्त करण्यात यावे यासाठी त्यांनी शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर वर मला जर आमदारकी मिळाली तर फक्त एक रुपया मध्ये मानधन घेऊन मी जनतेच्या सेवेत तत्पर कार्यरत राहील अशा प्रकारचे निवेदन माननीय राज्यपाल महोदय यांना दिले आहे तरी शेतकरी आत्महत्या तरुणांची व्यसनाधीनता युवकांची कार्यशक्ती वाढविणे महिलांवरील अत्याचार कामगारांचे प्रश्न हे सर्व मुद्दे सभागृहात मांडण्यासाठी एक तळागाळातील हे सर्व प्रश्न जाणणारा समाजसेवक म्हणून किसान पुत्र श्रीकांत गदळे हे अहोरात्र मेहनत करत असतात तरी मला मा.राज्यपाल महोदयांनी आपल्या कोट्यातील एका जागेवर आमदारकी या पदावर नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधना मधून केवळ 1 रू (एक रुपया) प्रति महिना मानधन स्वतःसाठी घेईल आणि उर्वरित रक्कम महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी खर्च करेल किंवा राज्य सरकारकडे जमा करे असे शंभर रुपयाच्या बॉण्ड वर लेखी देऊन विनंती केली आहे. .
त्यामुळे या पत्राची तात्काळ दखल घेऊन व तमाम समाजसेवक यांच्या वतीने श्रीकांत गदळे यांना आमदार म्हणून नियुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या भावनेतून व्यक्त होत आहे गेल्या दहा-बारा वर्षांपासून ते सातत्याने निस्वार्थीपणे राज्यातील जनतेचे गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार यांचे प्रश्न उचलून धरून मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात त्यामुळे लवकरात लवकर त्यांना आमदारकी द्यावी अशी मागणी होत आहे
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348