नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भारत रेल्वे मंत्रालय द्वारा वन स्टेशन वन प्रॉडक्ट आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून मुलुंड रेल्वे स्टेशन येथे रेणुका महिला औद्योगिक संस्था मर्यादित नाशिक या संस्थेतर्फे पैठणी साडी व सर्व प्रॉडक्ट खादी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुलुंड स्टेशन मास्टर मिश्रा सर, एस.एम. विकास सहाणे, CCI जितेंद्र मिश्रा, तिकीट कलेक्टर प्रसन्न कुमार, उमेश प्रसाद टीसी कर्मचारी, महेंद्र राणे कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर विष्णू भाऊ सांगळे, ओशन कंपनीचे डायरेक्टर व रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक राणे, जयप्रकाश हनुमंते, टेक्निकल एजन्सी डायरेक्टर राहुल हनुमंते, क्षमाताई गुजराती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित यावेळी उपस्थित महिला भगिनी रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या सदस्य पुष्पा कोल्हे, साक्षी महिला बचत गट मुलुंड, शोभाताई आव्हाड, भारतीताई सांगळे, कल्याण दगडे, दिपाली शेंडगे, चेतना शिरोडकर, अनिता पोद्दार, मानसी शेळके, प्रतीक्षा शेळके, मीना पडवळ, श्रीकृष्ण रायपूरकर, सुनील खामकर, ज्योती पाटील, क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी कुटे साहेब, कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था संस्थेच्या अध्यक्षा मंदाताई फड, पुष्पा कोल्हे, ऋषिकेश फड, विष्णू सांगळे, भारती सांगळे यांनी केले.