- विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी एम.एम.आर.डी.एचे आयुक्त यांना पत्र पाठवून मागितला खुलासा.
- मोगरा व्हिलेज नाव काढून पुनश्च शंकरवाडीच रेल्वे स्थानक नाव देण्याची रहिवाशांची मागणी.
नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मेट्रो लाईन ७ अद्याप पुर्णपणे सुरू झाली नसतानाही एमएमआरडीएने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. मेट्रोलाईन ७ वरील जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शंकरवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन मोगरा व्हिलेज ठेवण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले असून रहिवाशी याप्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे याप्रश्नी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याकडे येथील रेल्वे स्थानकास पुनश्च शंकरवाडी रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.
मुंबईच्या विकासात भर घालणार्या मेट्रोलाईन ६ व ७ चे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात युद्ध पातळीवर सुरू आहे. यातील मेट्रो लाईन ७ ची लांगी १६.५ कि.मी आहे. दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) असा हा मार्ग असून यात एकुण १४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या सर्व रेल्वे स्थानकांना राज्य शासनाने अगोदरच नावे दिली होती. मेट्रोच्या कामा दरम्यान वेळोवेळी पार पडणार्या राज्य शासनासमवेतच्या बैठकांमध्ये राज्य शासनाने त्यावेळी दिलेल्याच रेल्वे स्थानकांच्या नावाचा उल्लेख केला जायचा. मेट्रो लाईन ७ वरील शंकरवाडी नावाने प्रचलित असलेल्या परिसरातील रेल्वे स्थानकास शंकरवाडी रेल्वे स्थानक असे नाव दिले असतानाही कुणाच्या सांगण्यावरुन व का? या रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन मोगरा व्हिलेज ठेवण्यात आले, असा संतप्त सवाल रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मोगरा व्हिलेज हा विस्तीर्ण परिसर आहे. ज्या ठिकाणी मेट्रोल लाईन ७ चे येथील रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे हा परिसर शंकरवाडिी या नावानेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे सद्या मेट्रो लाईन क्र.७ वर शंकरवाडी रेल्वे स्थानक हे नाव बदलुन मोगरा व्हिलेज हे जे नाव देण्यात आले आहे ते पुनश्च बदलुन शंकरवाडीच ठेवण्यात यावे, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी. कारण येथील रहिवाशांच्या विविध शासकीय कागदपत्रांच्या नोंदीमध्ये शंकरवाडी या नावाचाच उल्लेख आहे. त्यामुळे पत्ता सांगतानाही शंकरवाडी, हे नाव आपोआप येथील रहिवाशांच्या तोंडातून बाहेर पडले. त्यामुळे मोगरा व्हिेलज हे नाव बदलुन शकरवाडी रेल्वे स्थानक हेच नाव देण्यात यावे, यासाठी स्थानिकांनी माझी भेट घेतली होती. एमएमआरडीएच्या याप्रश्नी घेतलेल्या निर्णयावर रहिवाशांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे येथील जनतेच्या भावानांचा तसेच तीव्र असंतोषाचा विचार करुन येथील रेल्वे स्थानकास देण्यात आलेले मोगरा व्हिलेज हे नाव बदलुन पुर्वीचेच शंकरवाडी हे नाव देण्यात यावे, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यांना दिले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348