ग्रामसेवकाला कामगार कल्याणच्या नियमाविषयी व जे-आर संदर्भात कामगार प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यास ग्रामसेवक असभ्य भाषेत वक्तत्व करत असेल तर सर्वसाधारण कामगारांचं काय होणार असा प्रश्न हिंगणघाट तालुक्यातील कामगारांना पडला आहे
✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन हिंगणघाट:- तालुक्यातील पारडी नगाजी येथील कामगार महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आपली कामगार नोंदणी करण्यासंदर्भात ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सचिवाचा सही- शिका आणण्याकरिता ग्रामपंचायत सचिव संदीप चव्हाण यांच्याकडे गेले असता त्यांनी दोन ते तीन दा वाटेल ते कारण सांगून कामगारांची टाळाटाळ केली.
पारडी (नगाजी) येथील त्रस्त कामगारांनी ९० दिवस प्रमाणपत्र ग्रामसेवकाच्या मार्फत न मिळण्याबाबत बाबत आपली समस्या क्रांतीसुर्य असंघटित कामगार संघटने कडे मांडली. कामगारांच्या समस्या बाबत क्रांतीसुर्य असंघटित कामगार संघटनेचे संघटक व कामगार प्रतिनिधी प्रज्योत लिहितकर यांनी ग्रामसेवक संदीप चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर नोंदणी प्रमाणपत्र बाबत व कामगार कल्याणच्या नियमावली व जे – आर विषयी विचारपूस केली असता संदीप चव्हाण यांनी असभ्य भाषेत भ्रमणध्वनीवर वक्तव्य केले. असंघटित कामगारांच्या कामगार प्रतिनिधी सोबतच ग्रामसेवक असभ्य भाषेत बोलत असेल तर सर्वसाधारण कामगारांचं काय? असा मोठा प्रश्न निर्माण होतो. असल्या ग्रामसेवकामुळे ग्रामीण भागातील बहुतांश कामगार शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहतात. कामगार प्रतिनिधीशी असभ्य भाषेत केल्या वक्तव्याच्या जाहीर निषेधार्थ क्रांतीसुर्य असंघटित कामगार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांच्याकडे ग्रामसेवक संदीप चव्हाण यांच्या विरोधात तक्रार नोंदवली झालेल्या प्रकरणाची चूक मान्य करून संदीप चव्हाण यांनी माफी मागावी अन्यथा क्रांतीसुर्य असंघटित कामगार संघटनेच्या वतीने व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी निवेदन देते वेळेस क्रांतीसुर्य असंघटित कामगार संघटनेचे संघटक प्रज्योत लिहितकर, हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनायक पिसे, प्रबोधनकार स्वरा तामगाडगे, सुदर्शन वासेकर, अशोक भगत, गीता जगताप, विनोद कळसकर, सविता चौधरी यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348