✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची तस्करी आणि वाहतूक होत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे डि.बी. पथकाने दारूबंदी विशेष मेाहिम राबवित आहे. त्या मोहिम दरम्यान पोलिसांनी अनेक अवैध दारू तस्करांना बेड्या ठोकल्या आहे.
आरोपी नामे दिनेश उर्फ बोमली नत्थुजी रामटेके, वय 30 वर्ष, रा. इंदिरा झोपडपट्टी समुद्रपुर, शंकर सुनिल काळे, वय 22 वर्ष, रा. इंदिरा झोपडपट्टी समुद्रपुर, सिध्दार्थ नरेंद्र चहांदे, वय 29 वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड हिंगणघाट, करण किशोर मोगरे, वय 26 वर्ष, रा. महात्मा फुले वार्ड हिंगणघाट, नितेश लक्ष्मण गेडाम, वय 24 वर्ष, रा. आशी, तह. वरोरा, ह.मु. महात्मा फुले वार्ड हिंगणघाट व एक विधी सघर्षीत बालक यांचे ताब्यातुन मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू व 02 मोटर सायकल असा एकुण 1,29,900 रू. चा माल जप्त करून, सर्व आरेापीतांविरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348